Andhra Pradesh Food Poisoning: आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील शाळेत २० विद्यार्थ्याना विषबाधा, रुग्णालयात उपाचार सुरु
आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे येलेश्वरम गुरुकुलम शाळेतील २० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कन्टीनमधील जेवण जेवल्यानंतर त्यांना विषबाधा झाली. कॅन्टनमधील जेवण जेवल्यानंतर मुलांना उलटी आणि पोटदुखी होऊ लागली.
Andhra Pradesh Food Poisoning: आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे येलेश्वरम गुरुकुलम शाळेतील २० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कन्टीनमधील जेवण जेवल्यानंतर त्यांना विषबाधा झाली. कॅन्टनमधील जेवण जेवल्यानंतर मुलांना उलटी आणि पोटदुखी होऊ लागली. विषबाधा झालेल्या मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यतात आले. येलेश्वरीच्या सरकारी रुग्णालयात मुलांवर उपचार सुरु आहे. कॅन्टीनमधील अस्वच्छेतेवर पालकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलांवर वैद्यकिय उपचार सुरु आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. अधिकारी या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे. (हेही वाचा- इंदूरच्या अनाथ आश्रमातील 12 मुलांची अन्नातून विषबाधा झाल्यामुळे प्रकृती खालावली, एकाचा मृत्यू)
काकीनाडा येथील विद्यार्थ्यांना विषबाधा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)