17 people Hospitalised After Eating Biryani: बिर्याणी खाल्यामुळे 17 जण पडले आजारी, रुग्णालयत उपचार सुरु, कर्नाटकातील घटना

कर्नाटकातील चिक्कमगलुरु जिल्ह्यात बिर्याणी खावून विषबाधा झाल्याने नऊ महिलांसह १७ लोक आजारी पडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे

Biryani (PC - pixabay)
17 people Hospitalised After Eating Biryani: कर्नाटकातील चिक्कमगलुरु जिल्ह्यात बिर्याणी खावून विषबाधा झाल्याने नऊ महिलांसह 17 लोक आजारी पडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. कदूर तालुक्यातील मारवणजी गावात ही घटना घडली. रविवारी एका खासगी कार्यक्रमासाठी बिर्याणी तयार करण्यात आली होती. मात्र, पीडितांनी सोमवारी उरलेली बिर्याणी खाल्ली आणि विषबाधा झाल्यामुळे आजारी पडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now