Maha Kumbh 2025: विजय देवरकोंडा महाकुंभमध्ये सहभगी; गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून त्रिवेणी संगमावर केले स्नान (See Photo)
अभिनेता विजय देवरकोंडा हा देखील महाकुंभमध्ये सहभागी झाला आहे. सोमवार त्याने त्रिवेणी संगमावर स्नान केले. त्याने त्याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Maha Kumbh 2025: आत्तापर्यंत देश विदेशातील राजकारण्यांनी, कलाकारांनी, खेळाडूंनी महाकुंभमध्ये (Maha Kumbh 2025) सहभाग नोंदवून त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. यात आत साऊथ आणि हिंदी अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने हजेरी लावली. हिंदू धर्मात महाकुंभला मोठे महत्त्व आहे. महाकुंभमध्ये काल विजय देवरकोंडा याने त्रिवेणी संगमला पवित्र गंगा नदीत स्नान केले. त्याने त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात तो भगवे कापडे घालून गळ्या रुद्राक्षाची माळ घालून स्नान करत आहेत. '2025 कुंभमेळा, सर्वात प्रिय आईसोबत प्रार्थना', असे कॅप्शन विजय देवरकोंडाने लिहिले आहे. विजयने केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. (‘Chhaava’ Box Office Collection Day 3: विकी कौशलचा 'छावा'ची दमदार कमाई, भारतात 3 दिवसांत 110 कोटींचा व्यवसाय)
विजय देवरकोंडा गंगेत डुबकी
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2025 11:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

