Bigg Boss Marathi 5: 'निक्की आणि वर्षाताईंची जोडी विळी भोपळ्यासारखी'; बिग बॉसने विचारलं कशी वाटली जोडी? वर्षाने दिलं 'हे' उत्तर, पहा व्हिडिओ
विशेष म्हणजे बिग बॉसने वर्षा उसगांवकरला त्यांची जोडी कशी वाटते? असा प्रश्न केला. यावर वर्षाने बिग बॉसला उत्तर देताना सांगितलं की, 'मला तुम्ही धर्मसंकटात टाकलं. निक्की आणि वर्षाची जोडी म्हणजे विळी भोपळ्यासारखी आहे. विळी आणि भोपळा जवळ आल्यावर काय होणार? शिरच्छेद...कोणाचा तरी असं वाटतंय. पण, जास्तचं तटका झाला.'
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या सीझनमध्ये मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) आणि निकी तांबोळी (Nikki Tamboli) यांच्यामध्ये जोरदार वाद होताना दिसत आहेत. अशातचं आता बिग बॉसने वर्षा आणि निकीची जोडी बनवली आहे. विशेष म्हणजे बिग बॉसने वर्षा उसगांवकरला त्यांची जोडी कशी वाटते? असा प्रश्न केला. यावर वर्षाने बिग बॉसला उत्तर देताना सांगितलं की, 'मला तुम्ही धर्मसंकटात टाकलं. निक्की आणि वर्षाची जोडी म्हणजे विळी भोपळ्यासारखी आहे. विळी आणि भोपळा जवळ आल्यावर काय होणार? शिरच्छेद...कोणाचा तरी असं वाटतंय. पण, जास्तचं तटका झाला.' यावर बिग बॉसने म्हटलं आहे की, विळी आणि भोपळा जवळ आले की, भाजी तर होतेच ना. (हेही वाचा - Bigg Boss Marathi 5: बिग बॉसने पहिल्यांदाच दिला स्पर्धकांना Captaincy साठी टास्क; स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली (Watch Video))
पहा व्हिडिओ -