सध्या महामिनिस्टर हे नवं पर्व (Maha Minister) महिलांच्या भेटीला आलं. या पर्वात अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्येच आता या महापर्वाला त्याची पहिली विजेती स्पर्धक मिळाली आहे. त्यामुळे 11 लाखांची पैठणी पटकावलेल्या Zeeया वहिनींची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाविषयीची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी अंतिम सामन्यातील खेळ पूर्ण करत 11 लाखांची पैठणी जिंकण्याचा मान पटकावला आहे. आज रविवारी प्रसारित होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात 11 लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगणार आहे. तसेच लक्ष्मी ढेकणे यांच्या पदरात 11 लाखांची सोन्याची जर आणि हिरे जडवलेली  पैठणी पडणार आहे की नाही हे पाहायला मिळेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)