Prachi Pisat's Post: ‘खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...'; ज्येष्ठ अभिनेत्याने मराठी अभिनेत्री प्राची पिसाटला पाठवले आक्षेपार्ह संदेश, स्क्रीनशॉट्स उघड

या संदेशांमध्ये सुदेश यांनी प्राचीला तिचा फोन नंबर मागितला आणि तिच्याशी फ्लर्ट करण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे अनेकांनी त्यांच्या वर्तनावर संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.

Prachi Pisat

मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. टीव्ही अभिनेत्री प्राची पिसाट हिने ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी तिला आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा खुलासा केला आहे. प्राचीने तिच्या सोशल मीडिया खात्यावर सुदेश यांनी पाठवलेल्या संदेशांचे स्क्रीनशॉट शेअर करत हा प्रकार उघड केला, ज्यामुळे मराठी मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. या संदेशांमध्ये सुदेश यांनी प्राचीला तिचा फोन नंबर मागितला आणि तिच्याशी फ्लर्ट करण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे अनेकांनी त्यांच्या वर्तनावर संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.

प्राचीने शेअर केलेल्या संदेशांच्या स्क्रीनशॉट्समध्ये, सुदेश यांनी प्राचीला तिचा नंबर पाठवण्याची विनंती केली, तसेच ‘खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह’, ‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय’, असे लिहिल्याचे दिसून येते. प्राचीने याबाबत आवाज उठवल्यानंतर, अनेकांनी प्राचीच्या या धाडसी पावलाचे कौतुक केले. तिच्या या पोस्टला हजारो प्रतिक्रिया मिळाल्या. प्राचीच्या या खुलाशाने मराठी सिनेसृष्टीत महिलांच्या सुरक्षिततेचा आणि व्यावसायिक वर्तनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (हेही वाचा; Wildlife Meat Consumption: Laapata Ladies चित्रपटातील अभिनेत्री Chhaya Kadam विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याशी शक्यता; वन्यजीव मांस सेवन केल्याच्या आरोपावरून PAWS ने लिहिले पत्र)

Prachi Pisat's Post: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

Women's Helpline:

राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाईन नंबर- 1800-180-5220

महाराष्ट्र राज्य महिला आयोग - (०२२) २६५९२७०७

महाराष्ट्र राज्य महिला आयोग हेल्पलाईन नंबर- १५५२०९

हिंंसाचार प्रकरणी तक्रार - 7827170170

Women Helpline Number - 112

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement