Munmun Dutta-Raj Anadkat Not Engaged: मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट यांच्या साखरपुड्याची बातमी खोटी; खुद्द अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

ही बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली.

Munmun Dutta-Raj Anadkat

काही काळापूर्वी, टीव्हीवरील एक लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी एक खास बातमी समोर आली होती. अहवालानुसार या शोमधील बबिता जीने गुपचूप टप्पूशी लग्न केल्याचे बोलले जात होते. म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकट यांच्या एंगेजमेंटची माहिती मिळाली होती. ही बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली. सोशल मिडियावर लोक याबाबत मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आणि मीम्स शेअर करू लागले.

अशा परिस्थितीत आता या वृत्तांमध्ये किती तथ्य आहे, याचा खुलासा खुद्द अभिनेत्री मुनमुन दत्तानेच केला आहे. आपल्या साखरपुड्याच्या बातम्यांवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुनमुनने ही बातमी साफ फेटाळून लावली आहे. ही बातमी एक अफवा असल्याचे सांगत, यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे तिने सांगितले आहे. हे अत्यंत हास्यास्पद असून यापैकी कोणत्याही गोष्टीत सत्याचा अंशही नाही. मी अशा खोट्या बातम्यांवर माझी शक्ती वाया घालवत नाही, असे ती म्हणाली आहे. तसेच यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही तिने केले आहे. (हेही वाचा: Kriti Kharbanda and Pulkit Samrat Wedding Update: क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राटचे 15 मार्चला गुरुग्राममध्ये होणार लग्न)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)