Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' कार्यक्रमातील Jethalal चे नाव ऐकताच Babita ची हटके प्रतिक्रिया
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा कार्यक्रम पाठीमागील अनेक वर्षांपासून एका खासगी वाहिनीवरुन प्रसारीत होतो. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला आहे. खास करुन जेठालाल (Jethalal) आणि बबीता (Babita) जी ही जोडी अनेकांच्या पसंतीचा भाग.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा कार्यक्रम पाठीमागील अनेक वर्षांपासून एका खासगी वाहिनीवरुन प्रसारीत होतो. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला आहे. खास करुन जेठालाल (Jethalal) आणि बबीता (Babita) जी ही जोडी अनेकांच्या पसंतीचा भाग. दरम्यान, अनेकदा लोक ऑनस्क्रीन पाहिलेली जोडी रिअल लाईफमध्येही तशीच असेल असे, समजून बसतात आणि मग गोंधळ होतो. बबीताजी हे पात्र साकारणारी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही खरेदी करताना परतत होती. इतक्यात तिला पापाराझींनी गाठले आणि जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी (Dilip Joshi) यांच्याबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नावर दत्ता हिने दिलेल्या प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आहे.
कार्यक्रम वेगळा आणि वास्तव जीवन वेगळे'
त्याचे झाले असे, मुनमुन दत्ता हिस पापाराझींनी रस्त्यात गाठले आणि प्रश्न विचारले. त्यामुळे दत्ता यांना प्रश्नांचे उत्तर देण्याशिवाय पर्याय नव्हता. अर्थात बबीताजी म्हणजेच दत्ता यांनी कोणत्याही तक्रारीशिवाय पापाराझींना फोटो आणि प्रश्नांची उत्तर दिली. पण, आपल्या आईसोबत ती जेव्हा फोटोसाठी पोझ देत होती तेव्हा, पापाराझींनी विचारले, 'तुमच्या वाढदिवसाला जेठालाल यांना बोलवणार का' पापाराझींचा हा प्रश्न ऐकताच दत्ता काहीशा नाराज झाल्या. पण लागलीच सावरत त्यांनी म्हटले.. 'अरे बाबा..' त्या पुढे काही बोलणार इतक्यात त्यांनी ते टाळले आणि म्हटले 'कधीतरी सोडून देत चला..' दरम्यान, मुनमुन दत्ता यांची आईसुद्धा हसू लागली. मग दत्ता यांनी म्हटले, 'कार्यक्रम वेगळा आणि वास्तव जीवन वेगळे असते.' नंतर त्यांनी काही फोटो पोझ दिल्या आणि त्या निघून गेल्या. (हेही वाचा, Munmun Dutta-Raj Anadkat Not Engaged: मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट यांच्या साखरपुड्याची बातमी खोटी; खुद्द अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया)
जेठालालची डाळ शिजली नाही
'तारक मेहता का उल्टा चश्मा' कार्यक्रमात दिलीप जोशी साकारत असलेला जेठालाल हा व्यवसाईक आहे. तर बबीताजी ही त्यांची सोसायटीतील रहिवाशी आणि शेजारी आहे. बबीता या जेठालाल यांना आवडत असतात. पण ते विवाहीत आहेत आणि वडिलांच्या पूर्ण धाकात. दुसऱ्या बाजूला बबीताजी भलत्याच नटखट आहेत. गेली कित्येक वर्षे त्या जेठालाल यांच्या शेजारी राहात आहेत. पण, त्यांनी जेठालालची डाळ काही शिजू दिली नाही. त्यांचीही मजेशीर केमेस्ट्री प्रेक्षकांनीही चांगलीच स्वीकारली आहे. (हेही वाचा, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah अभिनेत्री दिशा वकानीला घशाचा कर्करोग? जेठालालने दिली प्रतिक्रिया)
इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
वापरकर्त्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
दरम्यान, ज्या इनस्टाग्राम पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला त्या खाली वापरकर्त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले आहे, जिथे बबीता तिथे जेठालाल. दुसऱ्याने म्हटले आहे की, जेठालाल खूश हो गाय, तर आणखी एक वापरकर्ता म्हणतो, ' जेठालाल सोच रहा होगा कि, ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी'. एक युजर मात्र म्हणतो की, या कार्यक्रमामुळेच बबीता इथवर पोहोचली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

