Kapil Sharma I Am Not Done Yet: कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ
कपिल शर्मा त्याचा पहिला स्टँड अप घेऊन येत आहे, जो 28 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
लोकप्रिय कॉमेडियन आणि टीव्ही शो होस्ट कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या नेटफ्लिक्स (Netflix) पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून कपिल शर्माच्या चाहत्यांना हे जाणून घेण्याची उत्सुकता होती की कपिल शर्मा नेटफ्लिक्ससोबत काय आणणार आहे? चाहत्यांची ही उत्सुकता कपिल शर्माने आज म्हणजेच 5 जानेवारीला संपवली आहे. कपिल शर्मा त्याचा पहिला स्टँड अप घेऊन येत आहे, जो 28 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)