Bigg Boss Marathi 4 Winner: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला अक्षय केळकर

गेल्या 99 दिवसांत या खेळाने आपले भरभरून मनोरंजन केले. या खेळात सहभागी झालेल्या 16 स्पर्धकांचा खेळ आपण पाहिला.

Photo Credit - Twitter

Bigg Boss Marathi 4 Winner: गेल्या तीन महिन्यापासून घराघरात गाजत असलेल्या कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी शोची आज अखेर सांगता झाली. या भागाचा अक्षय केळकर विजेता ठरला आहे. गेल्या 99 दिवसांत या खेळाने आपले भरभरून मनोरंजन केले. या खेळात सहभागी झालेल्या 16 स्पर्धकांचा खेळ आपण पाहिला. पण विजेता कुणी एकच असतो, आणि अखेर 100 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला आहे. अपूर्वा आणि अक्षय केळकर (Akshay Kelkar) हे दोन स्पर्धक शेवटच्या टप्प्यात होते. यात अक्षय केळकरने बाजी मारली आहे. अक्षयला 15 लाख 55 हजार रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement