Akash Choudhary Attacked By Fans: मुंबईत आकाश चौधरीवर चाहत्यानी केला हल्ला, घटना कॅमेरात कैद
त्यानंतर आकाश चौधरी त्याच्या गाडीकडे जात असतांना त्याला मागून बाटली मारुन फेकली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Akash Choudhary Attacked By Fans: भाग्य लक्ष्मी या हिंदी मालिकीतील आकाश चौधरीने कमी वेळात भरपूर लोकप्रियता मिळवली, त्यात अभिनेता विराज सिंघानियाची भूमिका साकारली आहे. आता, एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुंबईतील त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर हल्ला होताना दिसत आहे. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये, आकाश त्याच्या चाहत्यांसोबत सेल्फी क्लिक करताना दिसत आहे आणि सेल्फी काढण्यास दोन तीन वेळा नकार दिल्यावर सेल्फी घेतला. तेथून निघून जात असताना कोणतीही एका भडकलेल्या चाहत्याने प्लास्टिक बॉटल फेकून मारली. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहून कंमेट देखील केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)