Murder News: मध्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने रागाच्या भरात केला खून, हत्येचे प्रकरण सीसीटीव्ही कॅमेरात कैद

एका हॉटेलबाहेर झालेल्या भांडणात एका 22 वर्षीय तरुणाची टोळीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Murder News: मध्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने रागाच्या भरात केला खून, हत्येचे प्रकरण सीसीटीव्ही कॅमेरात कैद
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Murder News: तामिळनाडूतील अंबत्तूर येथे एका हॉटेलबाहेर झालेल्या भांडणात एका 22 वर्षीय तरुणाची टोळीने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  दारूच्या नशेत हे भांडण झाल्याचे समोर आले. हे हत्येचे प्रकरण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. अंबत्तूर येथील एका हॉटेलच्या बाहेर पीडितेवर धारदार वस्तूने हल्ला झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या हत्येत त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  बालचंद्रन असे मृताचे नाव असून तो मूळचा अंबत्तूरचा असून तो अंबट्टू औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात काम करतो

मिळालेल्या माहितीनुसार, बालचंद्रन आणि दुसर्‍या व्यक्तीमध्ये ते हॉटेल मध्ये बिर्याणी विकत घेत असताना वाद झाल्यानंतर ही घटना घडली. बालचंद्रन मन्नलुरपेठेतील दारूच्या दुकानात मद्य प्राशन केल्यानंतर अन्न खरेदी करण्यासाठी भोजनालयाबाहेर थांबले होते. बालचंद्रन तिथे थांबले असताना तरुणांचा आणखी एक टोळी हॉटेलात आले. बालचंद्रन यांना चुकून दुसर्‍या गटातील व्यक्तीने ढकलले, त्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांच्यात हाणामारी झाली.

बालचंद्रनचा दुसऱ्या गटातील व्यक्तीसोबत जोरदार वाद झाले, त्यानंतर बालचंद्रनने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या टोळक्याने बालचंद्रनला घेरले आणि त्याला जमिनीवर ढकलून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका व्यक्तीने बालचंद्रन यांच्यावर चाकूने वार करून हत्या  केली. बालचंद्रन यांच्यावर चाकूने वार केल्यानंतर टोळीने घटनास्थळावरून पळ काढला.

पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या टोळीच्या शोधात आहे. बालचंद्रनाचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटने अंतर्गत पोलीसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2023 12:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).