Nitesh Pandey Passes Away: अनुपमा फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 51 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका करणारे अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचे मंगळवारी निधन झाले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पांडे यांचे वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

Nitesh Pandey (PC - Instagram)

Nitesh Pandey Passes Away: काही लोकप्रिय टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका करणारे अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचे मंगळवारी निधन झाले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पांडे यांचे वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नाशिकजवळील इगतपुरी येथे शूटिंग करत असताना ते कोसळले. त्यांच्या जाण्याने सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. यापूर्वी 'साराभाई व्हर्सेस साराभाई' अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली होती आणि आता नितीश पांडे यांच्या जाण्याने लोकांनाही धक्का बसला आहे. (हेही वाचा - Vaibhavi Upadhyaya Passes Away: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचा कार अपघातात मृत्यू)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nitesh Pandey (@iamniteshpandey)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now