अभिनेत्री Ketaki Chitale ला जामीन मंजूर; महिला आयोगाने पाठवली महाराष्ट्राच्या डीजीपींना नोटीस

केतकी चितळेला अॅट्रोसिटी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाने हा जामीन 25 हजार रुपये जात मुसलक्यावर मंजूर केला आहे.

Ketaki Chitale (Photo Credit: Twitter)

शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी केतकीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर केतकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. यानंतर केतकीवर इतरही काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले. आता केतकी चितळेला अॅट्रोसिटी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाने हा जामीन 25 हजार रुपये जात मुचलक्यावर मंजूर केला आहे.

दुसरीकडे, केतकी चितळे हिच्या अटकेची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपींना नोटीस पाठवली असून, मानहानीच्या तरतुदी लागू केल्याबद्दल आणि प्रत्यक्ष हजर राहण्याबद्दल 7 दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement