‘Anupamaa’: भाजप नेत्या Smriti Irani करणार टीव्हीवर पुनरागमन; दिसणार रुपाली गांगुलीच्या अनुपमा शोमध्ये- Reports

त्यामुळे 15 वर्षांच्या लीपनंतर शोची कथाही बदलली आहे. त्याचवेळी आता स्मृती इराणी या शोमध्ये एंट्री करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

Rupali Ganguly, Smriti Irani (Photo Credits: Instagram)

Smriti Irani To Make a TV Comeback: सध्या स्मृती इराणी राजकारणात जास्त सक्रिय असल्या तरी, एक काळ असा होता जेव्हा त्या टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा होत्या. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून त्यांना घराघरात ओळख मिळाली. आता त्या टीव्हीवर पुनरागमन करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अहवालानुसार, स्मृती इराणी रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा' मालिकेत दिसणार आहेत. 'अनुपमा' ही मालिका 15 वर्षांची झेप घेणार आहे. त्यामुळे 15 वर्षांच्या लीपनंतर शोची कथाही बदलली आहे. त्याचवेळी आता स्मृती इराणी या शोमध्ये एंट्री करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. असे झाले तर 15 वर्षांनंतर स्मृती इराणी क्चोत्या पडद्यावर दिसतील. 'अनुपमा'मध्ये रुपालीसोबत स्मृती खास कॅमिओ करणार आहेत. याआधी 2009 मध्ये प्रसारित झालेल्या 'मणिबेन डॉट कॉम' या कॉमेडी शोमध्ये त्या शेवटच्या दिसल्या होत्या. नंतर त्यांनी 'अमृता' नावाच्या बंगाली चित्रपटात काम केले. पुढे अभिनय सोडून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 2003 मध्ये त्या भारतीय जनता पक्षात सामील झाल्या. (हेही वाचा: Shark Tank Season 4: शार्क टँकच्या चौथ्या सीझनला Swiggy करणार स्पॉन्सर; घातली Zomato चे संस्थापक Deepinder Goyal यांना बाहेर काढण्याची अट- Reports)

Smriti Irani To Make a TV Comeback:

 

View this post on Instagram

 

A post shared by The Free Press Journal (@freepressjournal)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif