आगामी 4 Blind Men थ्रिलर चित्रपटाची घोषणा, चित्रपटात झळकणार दिग्गज कलाकारांची फौज

या चित्रपटात 4 वेगवेगळ्या वळणावरती असणाऱ्या या अंधव्यक्ती काही असामान्य परिस्थितीत सापडल्या असून नशीब त्यांना एकत्र घेऊन येते .

4 men Blind (Photo Credit - Instagram)

मराठी चित्रपटात सध्या नवीन नवीन प्रयोग केले जात आहे. नुकताच '4 ब्लाइंड मेन' (4 Blind Men) थ्रिलर चित्रपटाती घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट 4 अंध व्यक्ती आणि हत्ती यांवर आधारित प्रसिद्ध बोधकथेवर चित्रित केला आहे. या चित्रपटात 4 वेगवेगळ्या वळणावरती असणाऱ्या या अंधव्यक्ती काही असामान्य परिस्थितीत सापडल्या असून नशीब त्यांना एकत्र घेऊन येते . एकामागोमाग एक अशा घडलेल्या खूनांमुळे त्यांच संपूर्ण आयुष्य कायमच बदलून जाते. प्रेक्षकांना हा थ्रिलर चित्रपट खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे. अभिषेक मेरुकर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत झळकत असून सोबतच शुभंकर तावडे, संकर्षण कऱ्हाडे, शेखर दाते व मृण्मयी देशपांडे या दिग्गज कलाकारांची फौज झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now