Ranjana Biopic: "रंजना' मधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!!

लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करून पुढल्या वर्षी 3 मार्च 2023 रोजी 'रंजना - अनफोल्ड' रसिकांसमोर सादर करण्याची योजना आखण्यात आली आहे.

Ranjana Biopic (Photo Credit - YouTube

रंजना यांच्या जीवनावर आधारलेल्या 'रंजना - अनफोल्ड' (Ranjana Unfold) या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. डॅा. श्रीकांत भासी, चेअरमन - कार्निव्हल ग्रुप हे या चित्रपटाची प्रस्तुती करणार असून कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'रंजना - अनफोल्ड' या चित्रपटाद्वारे रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांचा प्रवास उलगडण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग हे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करून पुढल्या वर्षी 3 मार्च 2023 रोजी  'रंजना - अनफोल्ड' रसिकांसमोर सादर करण्याची योजना आखण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)