Gulkand Movie Teaser: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी ‘गुलकंद’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; सई ताम्हणकर, समीर चौघुलेसह हास्यजत्रातील कलाकारांनी वेधलं प्रेक्षकांचं लक्ष (Watch Video)

या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, तेजस राऊत, शार्विल आगटे, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत कलाकारांच्या भूमिका आहेत.

Gulkand Movie Teaser (फोटो सौजन्य - You Tube)

Gulkand Movie Teaser: ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ प्रस्तुत आणि ‘वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘गुलकंद’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने प्रेक्षकांना ही खास भेट देण्यात आली आहे. ‘गुलकंद’ चित्रपट 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी गुलकंद चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘गुलकंद’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, तेजस राऊत, शार्विल आगटे, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत कलाकारांचा समावेश आहे.

गुलकंद चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, पहा व्हिडिओ - 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement