Singer Pandit Sanjay Marathe Passes Away: लोकप्रिय शास्त्रीय गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय राम मराठे यांचे निधन; वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंडित संजय राम मराठे यांचे महाराष्ट्रातील ठाणे शहरातील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी ही माहिती दिली.

Pandit Sanjay Marathe Passes Away - News Drum (Photo Credits: X)

Singer Pandit Sanjay Marathe Passes Away: लोकप्रिय शास्त्रीय गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय राम मराठे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. संजय राम मराठे हे संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ पुत्र होते. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पंडित संजय राम मराठे यांचे महाराष्ट्रातील ठाणे शहरातील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी ही माहिती दिली. संजय राम मराठे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. हार्मोनियम वादन आणि गायनासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. (हेही वाचा: Zakir Hussain Dies: पद्मविभूषण झाकीर हुसेन यांनी जगाचा घेतला निरोप; तबला वादनाला मिळवून दिली होती नवी ओळख)

पंडित संजय राम मराठे यांचे निधन-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement