Har Har Mahadev: बाजीप्रभुचीं भूमिका साकारणार शरद केळकर! ‘हर हर महादेव’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर
अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याने यातील इतर कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे.
अभिजित देशपांडे (Abhijeet Deshpande) यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या बहुप्रतिक्षीत ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याने यातील इतर कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे. नुकताच सोशल मीडियावर नवीन मोशन पोस्टर शेअर करण्यात असुन ‘हर हर महादेव’ या चित्रपटात शरद केळकर (Sharadh Kelkar) बाजीप्रभू देशपांडेंची करारी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट झी स्टुडियोजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2022 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

