Ram Mandir Song Teaser Released: राम मंदिर उद्घाटनानिमित्त मराठी गाण्याचा टीझर रिलीज; भाजप नेते Atul Shah यांनी लॉन्च केला व्हिडिओ (Watch)
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त एक गाणे तयार केले जात आहे व नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
Ram Mandir Song Released: सध्या अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण देशात याबाबत उत्साह दिसून येत आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन केली जाईल. अशात अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त एक गाणे तयार केले जात आहे व नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. माजी आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल शहा यांच्या हस्ते आज मुंबईत या गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला. राम मंदिराचा अभिषेक सोहळा हा जगभरातील हिंदूंसाठी आनंदाचा क्षण आहे. हा आनंद या गाण्यातही दिसून येत आहे. हे गाणे मराठीमध्ये असून अतुल शहा यांनी त्याची निर्मिती केली आहे. गीत मोहन सामंत यांचे असून संगीत दत्ता शिंदे यांचे आहे. (हेही वाचा: राममंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे 19 जानेवारीपासून चालवणार 1,000 स्पेशल गाड्या)
पहा व्हिडिओ-