Priyanka Chopras' Marathi Film 'Paani': प्रियांका चोप्राच्या 'पाणी' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; Adinath Kothare ने केले आहे दिग्दर्शन, जाणून घ्या सविस्तर
प्रियांका चोप्राचा हा चौथा मराठी चित्रपट आहे. पाणी या चित्रपटात महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पाण्याच्या संघर्षाची कथा दाखवण्यात आली आहे.
Priyanka Chopras' Marathi Film 'Paani': ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राला आज कोणत्याही खास ओळखीची गरज नाही. बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता प्रियांका चोप्राच्या मराठी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रियांका चोप्राने तिच्या नव्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. या चित्रपटाचे नाव ‘पाणी’ असे असून, तो 18 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. प्रियांका चोप्राने ‘पाणी’साठी अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत हातमिळवणी केली आहे. प्रियांका चोप्रा राजश्री प्रॉडक्शनच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करत आहे. महत्वाचे म्हणजे आदिनाथ कोठारेने या चित्रपटाचे दुग्दर्शन केले आहे.
आदिनाथ कोठारेशिवाय या चित्रपटात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई आणि श्रीपाद जोशी यांच्या भूमिका आहेत. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित, हा चित्रपट हनुमंत केंद्रे यांच्या जीवनावर आधारित आहे. (हेही वाचा: Tejaswini Pandit Movie: राज ठाकरेंवर तेजस्विनी पंडित बनवणार चित्रपट? पाहा 'येक नंबर'ची झलक)
पहा पाणी चित्रपटाचा टीजर-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)