निखिल महाजन दिग्दर्शित 'Godavari'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, 'या' दिवशी झळकणार रुपेरी पडद्यावर
या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकार यात आहेत.
दिवंगत चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांना खास श्रद्धांजली अर्पण करत, अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांनी जिओ स्टुडिओजचा पुढील मराठी चित्रपट 'गोदावरी'च्या (Godavari) प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट येत्या 11 नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकार यात आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)