NVBLKNK Trailer: Mahesh Manjrekar यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर रीलीज (Watch Video)
बोल्ड तरीही वास्तववादी चित्रण या सिनेमामधून रसिकांसमोर मांडले जाणार आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर आज रीलीज करण्यात आला आहे. मुंबईत मिल बंद पडल्या आणि त्यांनंतर मिल कामगारांच्या पुढील पिढ्यांची झालेली वाताहात पुन्हा रूपेरी पडद्यावर घेऊन येण्यासाठी महेश मांजरेकर सज्ज आहेत. 14 जानेवारीला ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ हा सिनेमा रिलीज होत आहे. बोल्ड तरीही वास्तववादी चित्रण या सिनेमामधून रसिकांसमोर मांडले जाणार आहे.
‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ ट्रेलर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)