Nagraj Manjule New Movie: नागराज मंजुळेंच्या नव्या ‘खाशाबा’ चित्रपटाची घोषणा, 'झुंड'नंतर पुन्हा दिग्दर्शीत करणार खेळावर चित्रपट

हा चित्रपट 1952 हेलसिंकी येथील मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारे फ्रीस्टाइल कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे.

Khashaba Jadhav, Nagraj Manjule | (Photo Credits: Archived, edited)

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. सध्या नागराज ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. आता अशातच त्यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. जिओ स्टुडिओचा इन्फिनाईट टुगेदर हा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी जिओ स्टुडिओची निर्मिती असलेल्या विविध भाषांमधील आगामी 100 चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यावेळी आगामी ‘खाशाबा’ या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट 1952 हेलसिंकी येथील  मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारे फ्रीस्टाइल कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement