Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरचे बॉडी शेमिंग करणाऱ्या आणि ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, पाहा पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतली गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावर हिला बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागलं आहे.

गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) ही सध्या तिझ्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून केतकीनं बॉडी शेमिंग करणाऱ्या आणि ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. केतकीनं लिहिलं, "डिअर ट्रोलर्स, शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत, स्किनी, (हाडांचा सापळा) बारीक आहे. हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा सगळे बारीक, तशी मी सुद्धा आहे बारीक. तरीही अजिबात न थकता 17-18 तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं"  (हेही वाचा - Kangana Ranaut On PM Narendra Modi: 3 राज्यातील भाजपाच्या विजयानंतर कंगनाने केले ट्विट, पंतप्रधान मोदींची केली श्रीरामांसोबत तुलना)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Ketaki Mategaonkar (@ketakimategaonkar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now