Jhimma Trailer Release: चित्रपटगृहात रंगणार 'झिम्मा'चा खेळ, सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

'झिम्मा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित. सिनेमा 19 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(Photo Credit - Twittter)

झिम्मा (Jhimma) सिनेमाचा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा 'झिम्मा' हा मराठीतील पहिला बिग बजेट सिनेमा असणार आहे. त्यामुळे मराठी सिनेप्रेक्षकांना आता लवकरच सिनेमागृहात जाऊन झिम्माच्या खेळात सहभागी होता येणार आहे.  हा सिनेमा 19 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चूल आणि मूल' या संकल्पनेखाली वावरणाऱ्या स्त्रिया जेव्हा मोकळ्या आकाशाखाली स्वछंदी आयुष्य जगतात, तेव्हा त्यांची स्वतःशीच एक नवीन ओळख होते, त्यामुळे प्रत्येक महिलेने पाहावा, असा हा चित्रपट आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement