Ekda Yeun Tar Bagha Teaser: 'एकदा येऊन तर बघा' सिनेमातून प्रसाद खांडेकर चं दिग्दर्शनात पदार्पण; पहा धम्माल टीझर (Watch Video)

गिरीश कुलकर्णी, प्रसाद खांडेकर,नम्रता संभेराव, तेजस्विनी पंडित,ओंकार भोजने आणि विशाखा सुभेदार अशी कॉमेडीची तुफान टायमिंग असणारी मंडळी सिनेमामध्ये दिसत आहेत.

'एकदा येऊन तर बघा । INSTA

'एकदा येऊन तर बघा' सिनेमातून प्रसाद खांडेकर सिनेमाच्या दिग्दर्शनामध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाचं लेखनही प्रसादनेच केलं आहे. या सिनेमामध्ये गिरीश कुलकर्णी, प्रसाद खांडेकर,नम्रता संभेराव, तेजस्विनी पंडित,ओंकार भोजने आणि विशाखा सुभेदार दिसणार आहेत. या एकापेक्षा एक विनोदी कलाकारांचं टायमिंग या सिनेमात निखळ मनोरंजन देणार आहेत. "माझा लेखक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. 'एकदा येऊन तर बघा,' या आमच्या नव्या कोऱ्या हॉटेलचे इरसाल चालक आणि मालक यांची ओळख करून द्यायला घेऊन आलो आहोत.हा एकदम फ्रेश आणि खुसखुशीत टीझर!"असं म्हणत त्याने टीझर शेअर केला आहे.

पहा टीझर

 

View this post on Instagram

 

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement