Chandramukhi Teaser: प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी'चा टीझर प्रदर्शित; रूपेरी पडद्यावर सादर होणार राजकीय रशिली प्रेमकहाणी

चंद्रमुखी हा आगामी मराठी सिनेमा 29 एप्रिलला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

चंद्रमुखी टीझर । PC: Instagram

लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच आता  प्रतिक्षित अनेक महत्त्वाचे सिनेमे रिलीज साठी सज्ज आहेत. यामध्ये प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' सिनेमाचाही समावेश आहे. या सिनेमामध्ये एका राजकारणी आणि लावणी कलावंतिणीची प्रेमकहाणी रसिकांना पाहता येणार आहे. विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर ही बेतलेली आहे. तर सिनेमाला अजय-अतुलचं संगीत असल्याने पुन्हा लावण्या आणि ठसकेबाज संगीताचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. प्रसाद ओकने 'चंद्रमुखी'चं दिग्दर्शन केले आहे. अद्याप सिनेमातील मुख्य चेहरे गुलदस्त्यात आहेत.

चंद्रमुखी टीझर  

 

View this post on Instagram

 

A post shared by 🅿🆁🅰🆂🅰🅳 🅾🅰🅺 : प्रसाद ओक (@oakprasad)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement