Phullwanti Trailer: गश्मीर आणि प्राजक्ता माळी यांची जुगलबंदी, फुलवंतीचा धमाकेदार ट्रेलर लॉंच
मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित चित्रपट फुलवंतीचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये फुलवंती यांच्या भुमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी झळकणार आहे.
Phullwanti Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित चित्रपट 'फुलवंतीचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये फुलवंती यांच्या भुमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी झळकणार आहे. फुलवंती हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांची कादंबरी फुलवंती आधारीत आहे. फुलवंती चित्रपटातील प्राजक्ता माळी यांचा मराठमोळा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहे. चित्रपटात अनेक कलाकारांची मांडीयाळी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर कलाकार झळकणार आहे. (हेही वाचा- या दिवशी 'सिंघम अगेन'चा ट्रेलर होणार लॉन्च,आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिपीका दिसणार)