JNU Movie Teaser : 'भारत तेरे टुकडे होंगे', 'जय श्रीराम', 'राष्ट्रविरोधी गट'; जेएनयू चित्रपटाचा टीझर लाँच

नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित हेणार आहे. पण त्या आधी आज चित्रपटाचा टिझर लॉंच झाला आहे. टीझरमध्ये विद्यापीठावर आत्तापर्यंत जे काही घडले ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Photo Credit -Instagram

JNU Movie Teaser : जेएनयू चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये विद्यापीठातील वादग्रस्त घटना दाखवण्यात आल्या आहेत. ज्यात जेएनयूमध्ये (JNU )देशविरोधीत घोषणा (Bharat Tere Tukde Honge Slogan ), राजकीय, सामाजिक मुद्यांवर विद्यार्थ्यांची चळवळ, विद्यार्थी वर्गात कमी आणि बातम्यांमध्ये अधिक चर्चेत असतात, असे दाखवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले होते. देशात एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरू असताना राजकीय विषयांवरील चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. (हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj Adhyasan Center: दिल्लीच्या JNU मध्ये सुरु होणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र; केला जाणार महाराजांच्या चरित्राचा आणि राज्यकारभाराचा अभ्यास)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement