Richard Roundtree Passes Away: अभिनेते रिचर्ड राऊंडट्री यांचे निधन यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन

Richard Roundtree Passes Away: "पहिला ब्लॅक अॅक्शन हिरो" म्हणून ओळख मिळवलेले अमेरिकन अभिनेते रिचर्ड राऊंडट्री यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. पाठिमागील काही वर्षांपासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते.

Richard Roundtree Passes Away: "पहिला ब्लॅक अॅक्शन हिरो" म्हणून ओळख मिळवलेले अमेरिकन अभिनेते रिचर्ड राऊंडट्री यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. पाठिमागील काही वर्षांपासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. सन 1971 मध्ये आलेल्या 'शाफ्ट' चित्रपटातील त्यांच्या प्रतिष्ठित भूमिकेसाठी त्यांना जगभरात ओळख मिळाली. लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचे व्यवस्थापक पॅट्रिक मॅकमिन यांनी दुजोरा दिला. राउंडट्री यांची अभीनयाची कारकीर्द पाच दशकांची होती. 1971 च्या अॅक्शन थ्रिलरमध्ये त्यांनी डिटेक्टिव्ह जॉन शाफ्टची भूमिका केली होती. या चित्रपटाने त्यांना पहिला ब्लॅक अॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळवून दिली. शाफ्ट्स बिग स्कोअर या सिक्वेलमध्ये त्यांनी केलेल्या कामाची जगाने दखल घेतली.

एक्स पोस्ट

रिचर्ड राऊंडट्री यांच्या निधनानंतर टॅलेंट एजन्सी आर्टिस्ट्स अँड रिप्रेझेंटेटिव्ह एजन्सीने म्हटले आहे आहे की, "त्यांच्या उत्तुंग कारकीर्दीने जगभरातील मनोरंजनाचा चेहरा बदलला. त्यांचा चिरस्थायी वारसा येणाऱ्या पिढ्यांना जाणवेल. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now