Money Heist First 15 Minutes: 'मनी हाईस्ट' चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; प्रदर्शित झाली 5 व्या सिझनची पहिली 15 मिनिटे (Watch Video)
जगभरातील तमाम चाहते ‘मनी हाईस्ट’ च्या 5 व्या सीझनची आतुरतेने वाट पाहता आहे. उद्या म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी ‘मनी हाईस्ट 5’ रिलीज होणार आहे
जगभरातील तमाम चाहते ‘मनी हाईस्ट’ च्या 5 व्या सीझनची आतुरतेने वाट पाहता आहे. उद्या म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी ‘मनी हाईस्ट 5’ रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी असणाऱ्या ‘मनी हाईस्ट’बाबत खूपच हाईप निर्माण झाली आहे. मनी हाईस्टचा 5 वा सीझन दोन भागांमध्ये रिलीज होईल, खंड 1 उद्या 3 सप्टेंबर रोजी रिलीज होईल, आणि खंड 2 डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.
अशात आता मनी हाईस्टच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सिरीजच्या भाग 5 ची पहिली 15 मिनिटे प्रदर्शित झाली आहेत. या व्हिडिओमध्ये सिझन 4 मध्ये काय झाले हे देखील दाखवण्यात आले आहे.
Money Heist First 15 Minutes -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)