The Broken News Trailer: ZEE5 ओरिजनल सीरिज 'द ब्रोकन न्यूज' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, 'ब्रेकिंग न्यूज' मागील दिसणार सत्याची झलक
'द ब्रोकन न्यूज' 10 जून रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये प्रीमियर होईल आणि 190+ देशांमध्ये फक्त ZEE5 वर उपलब्ध असेल.
भारतातील सर्वात मोठे देशांतर्गत OTT प्लॅटफॉर्म आणि बहुभाषिक कथाकार, ZEE5 आणखी एक रोमांचक बेव सिरिज 'द ब्रोकन न्यूज' (The Broken News Trailer) लाँच करण्यासाठी सज्ज आहे. सोनाली बेंद्रे या शोद्वारे एक अभिनेत्री म्हणून पुनरागमन करत असताना, हा शो तिचा ओटीटी पदार्पणही आहे. यात जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, तारुक रैना, इंद्रनील सेनगुप्ता, फैसल रशीद, किरण कुमार, आकाश खुराना आणि संजीता भट्टाचार्य यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बीबीसी स्टुडिओज इंडिया निर्मित आणि विनय वैकुल दिग्दर्शित ही मालिका लोकप्रिय ब्रिटीश मालिका 'प्रेस' चे अधिकृत रूपांतर आहे. 'द ब्रोकन न्यूज' 10 जून रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये प्रीमियर होईल आणि 190+ देशांमध्ये फक्त ZEE5 वर उपलब्ध असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)