The Kerala Story: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी नागपुरात पाहिला 'द केरळ स्टोरी' चित्रपट
'द केरळ स्टोरी या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला आहे. काही भाजपशासित राज्यांमध्ये तो करमुक्त केला जात आहे, तर काही राज्यांमध्ये त्यावर बंदीही घातली जात आहे.
आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे 'द केरळ स्टोरी' चित्रपट पहिला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. एक प्रबोधनाची मोहीम असे त्यांनी या चित्रपटाचे वर्णन केले. फडणवीस यांनी नागपूरच्या व्हीआर मॉलमध्ये हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'हा चित्रपट नसून जनजागृतीची मोहीम आहे. एक हृदयद्रावक सत्य सिनेमातून समोर आणले जात आहे. समाजात भेदभाव कसा निर्माण केला जातो आणि महिलांवर कसा अन्याय होतो, या सगळ्या गोष्टी यात दाखवल्या आहेत.'
'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला आहे. काही भाजपशासित राज्यांमध्ये तो करमुक्त केला जात आहे, तर काही राज्यांमध्ये त्यावर बंदीही घातली जात आहे. (हेही वाचा: 'The Kerala Story' Controversy: 'द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला जाहीर फाशी द्या'- NCP MLA Jitendra Awhad)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)