‘Khel Khel Mein’ Box Office Collection Day 2: 'खेल खेल मे' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केली 2 कोटींची कमाई

अक्षय कुमार आणि वाणी कपूर स्टारर चित्रपट खेल खेल में बॉक्स ऑफिसवर पडला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली नाही तरी दुसऱ्या दिवशीही चित्रपटच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे.

Khel Khel Mein

‘Khel Khel Mein’ Box Office Collection Day 2:अक्षय कुमार आणि वाणी कपूर स्टारर चित्रपट खेल खेल में बॉक्स ऑफिसवर पडला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली नाही तरी दुसऱ्या दिवशीही चित्रपटच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, फरदीन खान, तापसी पन्नू आणि एमी विर्क यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्रामुख्याने मेट्रो शहरांतील प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला आहे तरी देखील चित्रपटाने हवी तेवढी कमाई केली नाही. आता येत्या तीन दिवसांत म्हणजेच शनिवार, रविवार आणि रक्षाबंधनाची सुट्टीत चित्रपटाची कमाई होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ५. २३ कोटी रुपये कमावले तर दुसऱ्या दिवशी 2.42 कोटी कमावले आहे. (हेही वाचा- बिग बॉस मराठीत सूरज चव्हाण घेणार अरबाजशी पंगा; नवा प्रोमो चर्चेत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now