अक्षय कुमारच्या 'Cuttputlli' या नव्या चित्रपटाचा टीझर रिलीज, पोलिस सीरियल किलरच्या शोधात
जन्माष्टीच्या मुहूर्तावर 'कटपुतली' चित्रपटाचा टीझर गुरुवारी रिलीज करण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या 'रक्षा बंधन' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरीमुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेला त्यांचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट होता. त्याचवेळी आता त्याच्या 'कटपुतली' या नव्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी तयार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंह दिसणार आहे. जन्माष्टीच्या मुहूर्तावर 'कटपुतली' चित्रपटाचा टीझर गुरुवारी रिलीज करण्यात आला आहे. यासोबतच चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे आणि 2 सप्टेंबरला तो ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर दाखल होईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)