Captain Miller Teaser Out: सुपरस्टार धनुषने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली खास भेट, 'कॅप्टन मिलर'चा धमाकेदार टीझर आऊट

सत्य ज्योती चित्रपटाच्या यूट्यूबवर 'कॅप्टन मिलर' चित्रपटाचा टीझर रात्री उशिरा शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. कॅप्टन मिलर या चित्रपटाची निर्मिती सेंथिल त्यागराजन आणि अर्जुन त्यागराजन यांनी केली आहे.

Captain Miller Teaser Out: सुपरस्टार धनुषने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली खास भेट, 'कॅप्टन मिलर'चा धमाकेदार टीझर आऊट

Captain Miller Teaser: सुपरस्टार धनुषच्या (Dhanush) आगामी 'कॅप्टन मिलर' या (Captain Miller) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर, आज अभिनेत्याचा 40 वा वाढदिवस आहे आणि या खास निमित्ताने धनुषच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सत्य ज्योती चित्रपटाच्या यूट्यूबवर 'कॅप्टन मिलर' चित्रपटाचा टीझर रात्री उशिरा शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. कॅप्टन मिलर या चित्रपटाची निर्मिती सेंथिल त्यागराजन आणि अर्जुन त्यागराजन यांनी केली आहे. या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर शिवराजकुमार, संदीप किशन आणि प्रियांका मोहन देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. धनुषचा आगामी चित्रपट कॅप्टन मिलर 15 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पहा टीझर

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2023 11:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).