Stree 2 Box Office Collection: स्त्री २ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, 500 कोटींचा टप्पा केला पार
हॉरर कॉमेडी स्रीने बॉक्स ऑफिसवर आता पर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तिसऱ्या वीकेंडमध्ये बाहुबली २ चा ७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. हा चित्रपट आता ५०० कोटींच्या प्रतिष्ठित क्लबमध्ये सामील झाला आहे.
Stree 2 Box Office Collection: हॉरर कॉमेडी स्रीने बॉक्स ऑफिसवर आता पर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तिसऱ्या वीकेंडमध्ये बाहुबली २ चा ७ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. हा चित्रपट आता ५०० कोटींच्या प्रतिष्ठित क्लबमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाने वीकेंड 3 मध्ये 48.75 कोटी रुपयांची कमाई केली, जी 'बाहुबली 2' हिंदीच्या 42.55 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या उत्कृष्ट कामगिरीसह, 'स्त्री 2' ने एकूण 502.35 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपट अजून चांगली कमाई करेल असे चिन्ह दिसत आहे. स्त्री २ हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा हिट ठरू शकतो.(हेही वाचा- कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलले)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)