Sikandar Teaser Launch Date & Time: माजी पंतप्रधान Manmohan Singh यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आजचा 'सिकंदर' चा टीझर लॉन्च रद्द; पहा नवी तारीख, वेळ
मनमोहन सिंह यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर 'सिकंदर' चा टीझर लॉन्च सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'सिकंदर' सिनेमाचा टीझर आज (27 डिसेंबर) लॉन्च होणार होता. मात्र सिनेनिर्माते साजिद नाडियाडवाला यांनी तो पुढे ढकलला आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे काल दिल्लीत वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले असताना आजच्या ऐवजी हा टीझर लॉन्च 28 डिसेंबर दिवशी सकाळी 11:07 वाजता होणार आहे. सोशल मीडीयामध्ये त्याची माहिती देण्यात आली आहे.
कधी रिलीज होणार 'सिकंदर' चा टीझर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)