‘Deva’ Box Office Collection Day 1: शाहिद कपूर आणि पूजा हेगडे यांच्या 'देवा' चित्रपटाची भारतात 5.78 कोटींची कमाई

शाहिद कपूर स्टारर अॅक्शन थ्रिलर 'देवा' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात पहायला मिळत आहे.

Photo Credit- X

‘Deva’ Box Office Collection Day 1: रोशन अँड्र्यूज यांनी 'देवा' या अॅक्शन ड्रामा चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शनात पदार्पण केले. 31 जानेवारी 2025 रोजी 'देवा' चित्रपट प्रदर्शित झाला. 'देवा' चित्रपटात पूजा हेगडे (Pooja Hegde), शाहिद कपूरने (Shahid Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी अंदाजे 5.78 कोटी रुपये कमावले. 'देवा' चित्रपटाचे कथानक एका हुशार पण बंडखोर पोलिस अधिकाऱ्याभोवती केंद्रित आहे. जो एका हाय-प्रोफाइल प्रकरणाची चौकशी करताना फसवणुकीचे जाळे उलगडतो. देवामध्ये पावेल गुलाटी, कुब्ब्रा सैत आणि इतर प्रतिभावान कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. (Chhaava Song Jaane Tu Out: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या आगामी 'छावा' चित्रपटातील 'जाने तू' हे पहिले गाणे रिलीज; अरजितच्या आवाजाने जिंकले सर्वांचं मनं)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now