Scam 2010- The Subrata Roy Saga: हंसल मेहता घेऊन येत आहेत 'स्कॅम' सिरीजचा तिसरा भाग; पाहायला मिळणार सुब्रत रॉयच्या 25,000 कोटींच्या घोटाळ्याची कथा

सुब्रत रॉय हा सहारा ग्रुप ऑफ बिझनेसचा संस्थापक होता.

Scam 2010- The Subrata Roy Saga

Scam 2010- The Subrata Roy Saga: चित्रपट दिग्दर्शक-निर्माते हंसल मेहता यांनी गुरुवारी (16 मे) त्यांच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली. 'स्कॅम 1992' आणि 'स्कॅम 2003' नंतर हंसल मेहता आता 'स्कॅम 2010' घेऊन येत आहेत. यावेळी हंसल मेहता त्यांच्या वेब सीरिजमध्ये सुब्रत रॉय यांची कथा दाखवणार आहेत, म्हणून त्यांनी या वेब सीरिजचे नाव 'स्कॅम 2010: द सुब्रत रॉय सागा' असे ठेवले आहे. तमल बंदोपाध्याय यांच्या ‘सहारा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकावर आधारित, स्टुडिओ नेक्स्टच्या सहकार्याने ॲप्लॉज एंटरटेनमेंट द्वारे या सिरीजची निर्मिती केली जाईल. मेहता ही सिरीज दिग्दर्शित करणार आहेत.

‘सहारा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात सुब्रत रॉय याच्यावर चिट-फंड हेराफेरीपासून ते बनावट गुंतवणूकदारांपर्यंतचे आरोप आहेत. सुब्रत रॉय हा सहारा ग्रुप ऑफ बिझनेसचा संस्थापक होता. सुब्रताला गुंतवणूकदारांच्या फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिला आणि 2016 मध्ये पॅरोलवर बाहेर आला. यानंतर सेबीने सर्वोच्च न्यायालयात त्याचा पॅरोल रद्द करण्याची मागणी केली आणि त्याला पुन्हा तुरुंगात टाकण्यात आले. त्याच्यावर 25 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होता. (हेही वाचा: Aishwary Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य लवकरच रुपेरी पडद्यावर, बॉलिवुड चित्रपटातून करणार अभिनयात पदार्पण)

पहा पोस्ट- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Applause Entertainment (@applausesocial)