Salman Khan Confirms Broken Ribs: 'दोन बरगड्या तुटल्या आहेत'; आजारपणाबाबत खुद्द सलमान खानने दिली माहिती, पहा व्हिडिओ (Watch)

बिग बॉस प्रोमो शूटवेळी सलमानला सेटवर मीडियाने घेरले होते, जे त्याचे काही फोटो घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र, तो वारंवार आपल्या बरगड्याला हात लावताना दिसला.

Salman Khan (Photo Credit - Facebook)

Salman Khan Confirms Broken Ribs: सलमान खान देशातील सर्वात प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. देशात-परदेशात त्याचे अनेक चाहते आहेत जे त्याच्या प्रत्येक नवीन अपडेटची प्रतीक्षा करत असतात. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेता भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय होस्टपैकी एक आहे. अभिनेता पुन्हा एकदा 'बिग बॉस 18' होस्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने 5 सप्टेंबर 2024 रोजी कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूट सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान शारीरकदृष्ट्या तांदरुस्त नसल्याच्या बातम्या येत आहे, आता त्याची पुष्टी खुद्द सलमान खानने केली आहे. अलीकडे, अभिनेत्याने त्याच्या अलीकडील बरगडीच्या दुखापतीबद्दल माहिती दिली.

बिग बॉस प्रोमो शूटवेळी सलमानला सेटवर मीडियाने घेरले होते, जे त्याचे काही फोटो घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र, तो वारंवार आपल्या बरगड्याला हात लावताना दिसला. यावेळी सलमानने आपल्या बरगड्याला दुखापत झाल्याचा खुलासा केला. सलमानला बरगडीला दुखापत झाली आहे आणि तरीही त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू ठेवले आहे. दरम्यान, सलमान शेवटचा मेगा-बजेट चित्रपट 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसला होता. आता तो लवकरच छोट्या पडद्यावर बिग बॉस 18 होस्ट करताना दिसणार आहे. याशिवाय अभिनेता त्याच्या पुढील चित्रपट सिकंदरवर काम करत आहे. (हेही वाचा: Border 2 चित्रपटात झळकणार दिलजीत दोसांझ, सोशल मीडियावर शेअर केला नवीन प्रोमो)

बरगड्यांच्या आजारपणाबाबत खुद्द सलमान खाने दिली माहिती-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now