Rohit Shetty चा पुन्हा एकदा धमाका; Cirkus चा दमदार Trailer रिलीज, रणवीरसोबत दिपीकाही आली दिसुन (Watch Trailer)
रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, संजय मिश्रा आणि जॉनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Cirkus Trailer: रोहित शेट्टी (Rohit Shetty) पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज झाला आहे. रणवीर सिंह स्टारर पीरियड कॉमेडी चित्रपट सर्कसचा ट्रेलर (Cirkus Trailer) आज रिलीज झाला आहे. हा दमदार ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही अपेक्षा करू शकता की हा चित्रपट तुमचा ख्रिसमस खास बनवणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, संजय मिश्रा आणि जॉनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोदाने भरलेला हा चित्रपट 23 डिसेंबरला ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. तसेच ट्रेलरच्या शेवटी दीपिका पदुकोण पती रणवीर सिंहसोबत डान्स करताना दिसत आहे.
पहा ट्रेलर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)