Richa Chadha and Ali Fazal Become Parents: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या घरी कन्यारत्न; सोशल मिडियाद्वारे दिली मुलीच्या जन्माची माहिती
अली आणि ऋचाने निवेदनात लिहिले, ‘16.07.24 रोजी निरोगी बाळाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे!'
Richa Chadha and Ali Fazal Become Parents: चित्रपटांमध्ये काम करणारे जोडपे ऋचा चढ्ढा आणि अली फजल पालक झाले आहेत. रिचाने 16 जुलै रोजी एका मुलीला जन्म दिला. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी एक स्टेटमेंट शेअर करून त्यांच्या मुलीच्या जन्माची माहिती दिली. अली आणि ऋचाने निवेदनात लिहिले, ‘16.07.24 रोजी निरोगी बाळाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे! आमचे कुटुंब खूप आनंदी आहे आणि आम्ही आमच्या शुभचिंतकांचे प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभारी आहोत.’ नुकतेच रिचाने तिच्या मॅटर्निटी शूटचे काही फोटो शेअर केले होते. फोटो शेअर करताना रिचाने लिहिले- ‘या अविश्वसनीय प्रवासात माझा साथीदार असल्याबद्दल धन्यवाद अली.’ ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांचे 2022 मध्ये लग्न झाले. याआधी दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. 2012 मध्ये फुकरे चित्रपटाच्या सेटवर दोघेही पहिल्यांदा भेटले होते. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने त्यांच्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली होती. (हेही वाचा: KL Rahul And Athiya Shetty New Apartment: क्रिकेटर केएल राहुल आणि पत्नी अथिया शेट्टी यांनी मुंबईच्या पाली हिल परिसरात खरेदी केले 20 कोटी रुपयांचे अपार्टमेंट)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)