Rehnaa Hai Terre Dil Mein: तब्बल 23 वर्षांनंतर पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार 'रहना है तेरे दिल में'; जाणून घ्या कधी

दिया आणि माधवनच्या प्रेमकथेवर आधारित 'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा, लोकांना तो खूप आवडला. त्याची गाणीही प्रचंड गाजली. आता 23 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Rehnaa Hai Terre Dil Mein: तब्बल 23 वर्षांनंतर पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार 'रहना है तेरे दिल में'; जाणून घ्या कधी
Poster of Rehnaa Hai Terre Dil Mein, Dia Mirza (Photo Credit: Twitter/Instagram)

Rehnaa Hai Terre Dil Mein To Re-Release in Theatres: या वर्षी, अनेक क्लासिक कल्ट बॉलीवूड चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाले. सलमान खान आणि माधुरी दीक्षित स्टारर हम आपके है कौन आणि तृप्ती दिमरी स्टारर लैला मजनू या चित्रपटांना पुन्हा थिएटरमध्ये खूप प्रेम मिळाले. आता आणखी एक चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. रहना है तेरे दिल में 2001 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. आर माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मिनाले या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. पूजा एंटरटेनमेंटने मंगळवारी चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. रहना है तेरे दिल में हा चित्रपट यावर्षी 30 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होत आहे. अशाप्रकारे रहना है तेरे दिल में या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि ते आजपर्यंत कायमअसल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: Home मनोरंजन बॉलिवूड ‘Border 2’: 'बॉर्डर 2' चित्रपटात वरुण धवनची धमाकेदार एन्ट्री, सनी देओल करणार दिग्दर्शन)

पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार 'रहना है तेरे दिल में'-

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Entertainment (@pooja_ent)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2024 11:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).