लोकप्रिय गायिका Falguni Pathak यांनी केला Mumbai Metro ने प्रवास; प्रवाशांना नवरात्रोत्सवात मेट्रो वापरण्याचा सल्ला (Watch Video)

आगामी नवरात्रोत्सवादरम्यान शहरात प्रवास करण्यासाठी मेट्रोचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.

Falguni Pathak (Photo Credit - Twitter)

प्रसिद्ध भारतीय गायिका आणि संगीतकार फाल्गुनी पाठक यांनी मंगळवारी मुंबई मेट्रोने प्रवास केला. आगामी नवरात्रोत्सवादरम्यान शहरात प्रवास करण्यासाठी मेट्रोचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. यावेळी त्या म्हणाल्या, ‘मला बरे वाटले. मेट्रो अतिशय सोयीस्कर आणि स्वच्छ आहे. या प्रवासाने मला माझ्या बालपणातील लोकल ट्रेनच्या प्रवासाची आठवण करून दिली. आपले शहर वाढत आहे हे पाहून खूप आनंद झाला. हा एक सुंदर अनुभव होता. नवरात्रोत्सवादरम्यान लोक मेट्रोने प्रवास करू शकतात आणि त्यांच्या गंतव्यस्थानी सोयीस्करपणे पोहोचू शकतात.’ पाठक यांनी कांदिवली मेट्रो स्टेशनवर प्रवाशांशी संवाद साधला. यंदा नवरात्रोत्सव 15 ते 23 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार आहे. (हेही वाचा: Saiyami Kher ची बॉलिंग पाहून जेव्हा Sachin Tendulkar देखील होतो आवाक; 'घुमर' अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement