Munjya Movie Trailer: अंगाला काटा आणणारा 'मुंज्या' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट होईल रिलीज
धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला होता.
Munjya Movie Trailer: बहुप्रतिक्षित बॉलिवूडचा 'मुंज्या' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला होता. टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. ट्रेलरमध्ये मुंज्या आणि मुन्नीचं रिलेशन दाखवले आहे. चित्रपटात अधुरी प्रेमकहाणी दाखवली आहे. तेच पाहण्याची प्रेक्षकांनी सिनेमासाठी उत्सुकता दाखवली आहे. चित्रपटात मराठी कलाकार झळकणार आहे. चित्रपटात शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय मोना सिंह, अभय वर्मा आणि सत्यराज सिंह दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सातपोतदार आहेत. येत्या महिन्यात ७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (हेही वाचा- 'कल्की 2898 एडी' या आगामी साय-फाय चित्रपटात बुज्जी बनला प्रभासचा चांगला मित्र, अप्रतिम व्हिडिओ रिलीज )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)