IPL Auction 2025 Live

Tipu Film Motion Poster: टिपू सुलतानच्या जीवनावर आधारित 'टीपू' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

तरण आदर्शने ट्विटरवर चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे.

Tipu Film Motion Poster (PC - Instagram)

Tipu Film Motion Poster: टिपू सुलतान (Tipu Sultan) च्या जीवनावर आधारित टीपू (Tipu) या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. इरॉस इंटरनॅशनल या चित्रपटाची निर्मिती करत आहे. टिपू चित्रपट हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. तरण आदर्शने ट्विटरवर चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. मोशन पोस्टरशिवाय त्याने चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. यामध्ये टिपू सुलतान पाहायला मिळत आहे. याशिवाय त्याच्या चेहऱ्यावर काळा रंगही दिसत आहे.

8000 मंदिरे पाडण्यात आली, 27 चर्च उद्ध्वस्त झाल्याची माहिती मोशन पोस्टरमध्ये देण्यात आली आहे. 40 लाख हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांना गोमांस खाण्यास भाग पाडले गेले. 1 लाख हिंदूंना तुरुंगात टाकले. कालिकतमध्ये 2000 ब्राह्मण कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचंही या मोशन पोस्टरमध्ये सांगण्यात आलं आहे. तरण आदर्शच्या ट्विटला 3 लाख 56 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, यावर सुमारे 19 हजारहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. (हेही वाचा - Nawazuddin Siddiqui चित्रपटात काम करणं सोडणार? मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने व्यक्त केली संन्यासी बनण्याची इच्छा)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sandeep Singh (@officialsandipssingh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)