Mithun Chakraborty to Receive Dadasaheb Phalke Award: भारतीय चित्रपटसृष्टीतील 'आयकॉनिक' योगदानासाठी मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
येत्या 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Mithun Chakraborty to Receive Dadasaheb Phalke Award: जेष्ठ बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी गेली अनेक दशके लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आता 74 वर्षीय अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी X खात्यावरील पोस्टमध्ये लिहिले, ‘मिथुन दा यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास प्रत्येक पिढीला प्रेरणा देतो! दादासाहेब फाळके निवड ज्युरीने दिग्गज अभिनेते, श्री मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.’
येत्या 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मिथुन यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1977 मध्ये आलेल्या 'मृग्या' चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपर-डुपर हिट चित्रपट दिले. (हेही वाचा: Dhoom 4: रणबीर कपूर आणि धूम 4? मग अभिषेक बच्चन आणि उदय चोपडा यांचे काय?)
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर-
Mithun Da’s remarkable cinematic journey inspires generations!
Honoured to announce that the Dadasaheb Phalke Selection Jury has decided to award legendary actor, Sh. Mithun Chakraborty Ji for his iconic contribution to Indian Cinema.
🗓️To be presented at the 70th National…
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 11:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

